अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पैलाड भागातील चौकातून एका व्यापारासह इतर चार जणांच्या खिशातून ६४ हजारांची रोकड लांबवल्याची घटना बुधवारी १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर शेख अजित शेख वय-२४, रा. तेली स्कूलजवळ, भुसावळ असे चोरट्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील पैलाड भागातील चौकात बुधवारी १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता अजय रघुनाथ केले वय-५६ रा. प्रोफेसर कॉलनी अमळनेर यांच्यासह रवींद्र मधुकर पाटील, गजानन नाना सूर्यवंशी, गोपीचंद दगडू चौधरी आणि अमोल कैलास महाजन या पाच जणांच्या खिशातून संशयित आरोपी अमीर शेख अजित शेख वय-२४ रा. तेली स्कूल जवळ भुसावळ याने एकूण ६४ हजार रुपयांची रोकड चोरून नेले आहे, दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंतर अजय केले यांच्यासह इतरांनी रात्री ९ वाजता अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी अमीर शेख अजित शेख यांच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.