जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील मन्यारखेडा फाट्याजवळ उभ्या असलेल्या बोलेरो कार मधून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १४ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी २३ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, राहुल काशिनाथ कोळी वय ३० रा. कांचन नगर जळगाव तरुण आपला परिवारासह वास्तव्याला असून खाजगी वाहनावर तो चालक म्हणून नोकरीला आहे. दरम्यान त्याच्याकडे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय ७६८८) आहेत. २२ जून रोजी रात्री ११ वाजता त्याने बोलेरो वाहन नशिराबाद गावाजवळील मण्यारखेडा फाट्याजवळ प्रगती रिसॉर्ट जवळ पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने वाहनात ठेवलेले २ लाख १४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी २३ जून रोजी सकाळी ६ वाजता समोर आले त्यानुसार राहुल कोळी यांनी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे.