Home क्राईम शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आ. खडसेंवर गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आ. खडसेंवर गुन्हा दाखल


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सावदा पोलिस ठाण्यात अश्लील भाषेचा वापर करून पोलिसांचा अवमान करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास आमदार खडसे हे सावदा पोलिस ठाण्यात आले होते. एका प्रकरणात गुन्हा दाखल न केल्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी पोलिस ठाण्यात कथितरित्या जोरदार वादावादी झाली. या दरम्यान शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला तसेच अधिकाऱ्यांशी बोलताना अश्लील भाषेचा वापर करून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित कायद्यांन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार एकनाथराव खडसे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.


Protected Content

Play sound