Home Cities एरंडोल अल्पवयीन मुलीवर अत्याचार, धमकावणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, धमकावणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी कविराज महाजन उर्फ बापू याच्याविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ही घटना घडली. संशयित आरोपी कविराज महाजन उर्फ बापू (वय अंदाजे ३५, रा. एरंडोल) याने डिसेंबर २०२३ च्या सुमारास पीडित मुलीवर अत्याचार केला होता.

या गंभीर कृत्यानंतर त्याने पीडितेचे वडील आणि भाऊ यांना ‘ठार मारण्याची’ जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर पीडित मुलगी ही मुंबईला निघून गेली होती. मात्र, काही काळानंतर आरोपीने पुन्हा तिच्याशी संपर्क साधून ‘माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या नातेवाईकांना संपवून टाकीन’ अशी धमकी दिली, ज्यामुळे पीडितेच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली.

अखेरीस पीडित अल्पवयीन मुलीने हिंमत दाखवत एरंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ संशयित आरोपी कविराज महाजन उर्फ बापू याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound