चोपडा प्रतिनिधी । येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा चौधरी व त्यांचे पती जीवन चौधरी यांच्या विरूध्दचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा उच्च न्यायालयाने खारीज केला आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा जीवन चौधरी व गटनेते जीवन चौधरी तसेच रमेश एकनाथ चौधरी यांच्याविरुद्ध मंगलाबाई संजय भिल यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये ट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यासंदर्भात उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अॅड. विनोद पाटील व अॅड. निर्मल देशमुख यांनी या गुन्ह्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करून या गुन्ह्याबाबत आपली भूमिका म्हणून न्यायालयात बाजू मांडणे हा गुन्हा थेट खारिज करण्यात आल्याची माहिती पालीकेचे गटनेते जीवन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
अॅट्रॉसिटी दाखल करणार्या मंगलाबाई भिल्ल यांना हाताशी धरून लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, रमेश चौधरी यांचे विरुद्ध १३ सप्टेंबर २०१८ रोजी खोटी केस दाखल केली होती हे औरंगाबाद उच्च न्यायालयात सिद्ध झाल्याने आमचे विरुद्ध ती केस खारीज केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आम्ही शहराच्या जनतेवर विश्वास ठेवून काम करत आहोत. चोपडा तालुक्याची ही राजकीय संस्कृती नसल्याने अश्या खोट्या केसेस करू नये व त्या करणार्यांच्या पाठीशी जनतेने देखील राहू नये असेही जीवन चौधरी यांनी सांगितले. आपल्या कडून उच्च न्यायालयाचा निकाल लागला असला तरी आपण कोणत्याही प्रकारची मानहानीची केस दाखल करणार नसून आम्ही संपूर्ण शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक व गटनेते विकासासाठी राजकारण करणार नाही व जनतेच्या सोबत राहून चोपड्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहू, असेही जीवन चौधरी यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा मनीषा चौधरी, उपनगराध्यक्ष हुसेन पठाण, नगरसेवक हितेंद्र देशमुख, अशोक बाविस्कर,रमेश शिंदे, नारायण बोरोले, सीमा श्रावगी, सुरेखा माळी, डॉ नरेंद्र शिरसाठ,चेतन चौधरी,कांतीलाल सनेर, वसंत पवार, नोमान काझी, अकिल जहागीरदार, देवा पारधी आदी हजर होते.