तोंडी तलाक दिल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पत्नीला मारहाण करून तोंडी तिन वेळा तलाक दिल्या प्रकरणी पती विरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना रावेर शहरातील फतेह नगर भागातील पाण्याच्या टाकीजवळ घडली यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत वृत्त असे की शबनमबी हीने पती इस्माईल शेख यास तुझे बाहेर अनैतीक संबध आहे का? असा जाब विचारल्याने संप्तत झालेल्या तीचा पती इस्माईल शेख याने त्याची पत्नी हे शबनमबी हिला मारहाण करीत आजसे.. मैं तुम्हे तलाक दे रहा हु..असे तिन वेळा तलाक…म्हणुन तु माझी पत्नी नाही असे म्हणून शबनमबी हीला तोंडी तलाक दिल्याने शबनमबी हीच्या फिर्यादी वरून रावेर पोलिस स्टेशनला पती विरुद्ध मुस्लिम महिला विवाह अधिकार संवरक्षण अधिनियम 2019 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तपास पोलीस नाईक किशोर सपकाळे करीत आहे.

Protected Content