Home क्राईम नगरसेवक संतोष पाटलांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी

नगरसेवक संतोष पाटलांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी

0
38


जळगाव प्रतिनिधी । काही दिवसांपूर्वीच गोळीबारातून सुदैवाने बचावलेले नगरसेवक संतोष पाटील यांना आज पुन्हा जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत वृत्तांत असा की, माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर ३१ डिसेंबर रोजी गोळीबार करण्यात आला होता. यातून ते सुदैवाने बचावले होते. दरम्यान, आज ते कुटुंबियांसह मंदिरात जात असताना नारायण दला हटकर याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार राजीव गांधी नगरजवळ घडला. संतोष मोतीराम पाटील हे कुटुंबासह कारने मंदिरात जात होते. यादरम्यान राजीवगांधी नगर येथील साईबाबा मंदिरासमोर त्यांना नारायण दला हटकर (रा. मुकूंद नगर, स्वामी समर्थ मंदिराजवळ ) याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. असे माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. तर संतोष मोतीराम पाटील, उषाबाई पाटील, निलेश संतोष पाटील व पवन संतोष पाटील या चौघांनी दुचाकीसमोर कार आणून काही कारण नसताना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नारायण दला हटकर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान संतोष पाटील यांनी पोलीस दलातील अंगरक्षक सुरक्षेसाठी तातडीने पुरविण्यात यावा, असे संतोष पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद असून हे निवेदन त्यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षकांना दिले आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अरबाज पिंजारी, जिगर बोंडारे, शेख समीर या तिघाना अटक झाली आहे. मात्र उर्वरित संशयित बुधा दला हटकर, कैलास बुधा हटकर, आनंदा बुधा हटकर, लखन नारायण हटकर, राहूल सुरेश हटकर, ईश्‍वर तायडे हे फरार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound