जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील मंगलपूरी नगरात भरधाव कार चालवून रिक्षा व सायकलीसह पाच महिलांना धडक देण्यासह एका वृद्धेला फरफरट नेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी १८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. याप्रकरणी अटकेत असलेला कार चालक पवन कैलास पाटील (वय-२५, रा. रामेश्वर कॉलनी) याला शुक्रवारी १९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या ५ महिलांसह २ चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत या धडकेत शोभाबाई रमेश पाटील (वय-६५) यांना वाहनासह फरफटत नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तर इतर जखमी झाले होते. याप्रकरणी पवन पाटील याला एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आले. त्याला शुक्रवारी १९ जुलै रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात हजर केले असता त्याला संशयित आरोपी कार चालका याला बुधवार २४ जुलैपर्यंत ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. अविनाश पाटील यांनी काम पाहिले.