भुसावळ प्रतिनिधी । शहरातील भीम आर्मीचा वतीने आज उत्तप्रदेशतील हाथसर येथील घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला.
उत्तर प्रदेशातील हाथसर येथे दलित युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात देशभरात या घटनेचा तीव्र निषेध केला जातो आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे भीम आर्मीच्या वतीने कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी योगी सरकारविरोधात घोषणाबाजी करत पीडित तरुणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देवून पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी भीमसैनिकांचा वतीने करण्यात आली.