जळगाव प्रतिनिधी । बालगृह व निरीक्षण गृह संस्थेतील रिक्तपद भरती प्रक्रियेत उमेदवारांनी भरतीबाबत आमिषाला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी केलं.
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत बालगृह व निरीक्षण गृह संस्थेतील रिक्तपद भरती प्रक्रिया पारदर्शी राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी भरतीबाबत आमिषाला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी मंळवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
दिलेल्या पत्रात त्यानी म्हटले आहे की, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फन संकेतस्थळावर जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित जळगाव येथील मुलां-मुलींचे बालगृह व निरीक्षण गृह या संस्थेतील रिक्तपद भरतीसाठी पात्र व अपात्र संभव्य उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात हरकती नोंदविण्यात आले आहे.
दरम्यान उमेदवारांनी अज्ञात व्यक्तीने संस्थेत काम करून देतो असे सांगून उमेदवारांना ऑनलाईन पैसे टाकण्यास सांगण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहे. याबाबत उमेदवार व नातेवाईकांनी अश्या प्रकारच्या अमिषांना कूणीही बळी पडू नये, ही भरतीप्रक्रिया पुर्णपणे पारदर्शी व गुणवत्तेच्या निकषानुसार केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळवली आहे.