पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील माहेजी व कुरंगी येथील गिरणा नदी पात्रासाठी देण्यात आलेल्या वाळू ठेक्यात शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याने याला रद्द करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
शासनाने दिलेल्या वाळू ठेक्यामुळे महसूल मिळाला आहे. मात्र दुष्काळाची भयंकर परिस्थिती पाणी टंचाई पर्यावरण असे धोक्याची परिस्थिती आहे या वाळू उपशामुळे शिवारांत जल पातळी खालावत आहे. याचा फटका शेतकर्यांना बसत असून हा वाळू ठेका रद्द करावी मागणी आहे. दरम्यान, वाळू उपसा करण्यासाठी महसूल विभाग तहसील व प्रांताधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाळू ठेका देण्याची बाब संशयास्पद मानली जात आहे. तसेच संबंधीत वाळू ठेका लिलाव देताना संबंधित ठेकेदाराला अनेक नियम व अटी घालण्यात आल्या आहेत का ? याची संबंधीत ठेकेदारांकडून नियमांची अंमलबजावणी होते की नाही? याची तपासणी महसूल यंत्रणा करत नसल्यामुळे नदीकडेला गिरणा पात्रात वाळू उपसा बाबत ठेकेदारांची मनमानी सुरु झाली आहे. शासनाच्या रीतसर सर्व नियमावली झुगारुन ठेकेदारांनी जेसीबीच्या सहायाने रोज २००ते २५० डंपर भरून प्रचंड मोठया प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. अर्थात येथे शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले असल्याने हा वाळू ठेका रद्द करावा अशी मागणी होत आहे.