पाचोरा, प्रतिनिधी | सामनेर येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथे तंबाखूजन्य पदार्थ, व्यसनमुक्तीवर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेच्या १०० यार्डच्या परीसरास तंबाखूमुक्त क्षेत्र घोषित करण्यात आले.
आज मंगळवार, दि.२१ डिसेंबर रोजी सामनेर येथील म.गांधी माध्यमिक विद्यालय येथे तंबाखूजन्य पदार्थ, व्यसनमुक्तीवर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी सामनेर केंद्राचे केंद्रप्रमुख धीरजसिंग पाटील होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक व्ही. एस. जाधव, पर्यवेक्षक एस. बी. पाटील, आर. आर. भोसले, जी. डी. पाटील, ए. एन. चौधरी, एन. ए. वाघ, जी. एस. देशमुख, व्ही. बी. पाटील आणि सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोस्टर निर्मिती, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यालयाच्या गेटसमोर व्यसन मुक्तीचे चित्र रेखाटण्यात आले. शाळेचा १०० यार्डचा परीसर तंबाखूमुक्त क्षेत्र घोषित करण्यात आले. या परीसरात धुम्रपान करतांना कोणी व्यक्ती दिसल्यास त्यास ५०० रुपये दंडाच्या नियमाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
तंबाखूमुक्त शाळा मॉनिटर यांची निवड करण्यात आली. शिक्षकांमधून वाय.के.वंजारी, डी. व्ही.निकुंभ हे शिक्षक प्रतिनिधी निवडण्यात आले.
यावेळी विविध भित्तिपत्रकाचे अनावरण केंदप्रमुख, मुख्याध्यापक यांच्याहस्ते करण्यात आले. रंगरंगोटी, फलक लेखनाची जबाबदारी आर.ए.कोळी, वाय.जे.गांगुर्डे यांनी पार पाडली. रांगोळी रेखाटन श्रीमती वसईकर, संगीता पाटील यांनी केले. याकामी एस.पी.देहडे, एस.सी.सिसोदे, जी.एम.नानोटे, डी.एस.पाटील यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.