जळगाव प्रतिनिधी । येथील पिपल्स बँक व कै. रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित ज. पब्लिक स्कूलमध्ये (दि.७) रोजी सिनिअर के.जी.च्या विद्यार्थांसाठी १ दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात विद्यार्थांना चित्रकला, हस्तकला, योगासन, किल्ला तयार करणे. विविध कलाकृतीचे प्रशिक्षण देण्यात आले. झाडांची पाने
वापरून विविध कलाकृती तयार करण्यात आल्या. विद्यार्थांनी फोर कॉर्नर, हेड शोल्डर, मियुझीकल चेअर यासारखे खेळ खेळून मनसोक्त आनद लुटला. शिबिरादरम्यान विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यासर्व कार्यक्रमाचे नियोजन मनीषा पाटील व हर्षा पाटील यांनी केले असून शाळेच्या मुख्याध्यापिका छाया पाटील यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. या सर्व कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.