जळगाव, प्रतिनिधी | खान्देशात प्रथमच छंद शिबीर घेण्यात येत असून पोस्टाची तिकिटे याविषयी माहिती दिली जाणार आहे. याकरिता नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगावच्या फिलेटली ग्रुपच्या वतीने आयोजन असून शिबिरासाठी जागा मर्यादित आहे. ३० जणांनाच प्रवेश असून त्याकरिता नोंदणी आवश्यक आहे. ८ ते १० नोव्हेबर रोजी हे शिबीर होणार असून यात पोस्टाच्या तिकिटांचा इतिहास, ती कशी जतन करावी, तिकिटांचे आराखडे यासह पोस्ट तिकिटांसाठी असणा-या शिष्यवृत्ती व स्पर्धांची माहिती दिली जाणार आहे. नोंदणीसाठी रामानंद नगर परिसरातील विवेकानंद नगर भागातील कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिर येथे शालेय वेळेत किवा भूषण ब-हाटे (७३८७८१८२४८), सिद्धेश कोटेचा (८८५५०००९३७) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.