Home Cities जामनेर शेंदुर्णीत मंगळवारी कडकडीत बंदचे आवाहन

शेंदुर्णीत मंगळवारी कडकडीत बंदचे आवाहन


शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जालना जिल्ह्यातील आंतर वली सराटी येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधवांवर पोलिस प्रशासनाकडून अमानुषपणे लाठीमार करण्यात आला, याच्या निषेधार्थ मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी शेंदुर्णी शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. या बंदला नागरीकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधवांवर पोलिस प्रशासनाकडून अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. अनेक माता भगिनी वृद्ध, बालक व युवक जखमी झाले त्या क्रूर हल्ल्याच्या निषेधार्थ शेंदूर्णी येथे मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी  गाव बंदची हाक देण्यात आली असून  दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.  तरी व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने/प्रतिष्ठाने बंद ठेऊन मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन सकल मराठा समाज शेंदूर्णी यांचे कडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound