Home Cities जळगाव जळगावात बहुभाषिक ब्राह्मण संघाची दिनदर्शिका प्रकाशित 

जळगावात बहुभाषिक ब्राह्मण संघाची दिनदर्शिका प्रकाशित 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने आगामी वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि भगवान परशुराम जयंती महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेचे श्रीराम चरणी अर्पण करण्याचा भाविक सोहळा उत्साहात पार पडला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे समाजात आनंद आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या विशेष दिनदर्शिकेचे अधिकृत प्रकाशन गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजातील ऐक्य अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. तसेच, दिनदर्शिकेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. याच वेळी आगामी परशुराम जयंती उत्सवाचे पहिले निमंत्रण श्रीरामाच्या चरणी अर्पण करून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाला बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ओम त्रिवेदी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांमध्ये श्रीकांत खटोड, दिनेश कुलकर्णी, स्वप्नगंगा जोशी, श्रद्धा कुलकर्णी, हर्षल भंडारी, तुषार देशपांडे, विजय जोशी, पियुष रावळ, नितीन पारगावकर, मनीषजी पात्रीकर, महेंद्र पुरोहित, शिवजी शर्मा, अमित महाबळ जोशी, सुहास जोशी, डॉ. निलेश राव, विकास शुक्ल, नंदू शुक्ल, मुकुंद धर्माधिकारी, श्रीराम जोशी, श्रीधर जोशी, विश्वनाथ जोशी, पंकज पवनिकर आणि गणेश दायमा यांचा समावेश होता. सर्वांनी कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने हजेरी लावून उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमामुळे समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अध्यक्ष ओम त्रिवेदी यांनी दिनदर्शिका ही केवळ तारखा दर्शवणारी नसून, समाजाच्या सांस्कृतिक वारशाला जपणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound