भुसावळात ‘आपत्ती व्यवस्थापन’तर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांचे मॉकड्रिल (व्हिडीओ)

bhusaval

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील सुरक्षा विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन दल पुणे यांच्यासह कार्यरत रेल्वे कर्मचा-यांच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्तांची सुटका करण्यासाठी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आपत्ती व्यवस्थापन बल पुणे विभागामार्फत दि. 1 ऑक्टोबर रोजी मॉकड्रिलसाठी सकाळी 9:18 जे 9:30 पर्यंत सर्व अधिकारी आणि वैद्यकीय रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी भुसावळ रेल्वे स्थानकात 23 प्रवासी होते. या प्रात्याक्षिकावेळी एक रेल्वे डब्बा दुस-या डब्बावर चढल्यामुळे अपघात झाला असून यात 17 प्रवाशांना जीव गमवावा लागला तर 5 गंभीर जखमी झाले तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. मेजर यांनी जखमींना वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात आले तर किरकोळ जखमींवर तिथेच प्राथमिक उपचार करण्यात आले. तर काही सामान्य लोकांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. एनडीआरएफ, सेंट जॉर्ज अम्ब्युलन्स, सिव्हिल अम्ब्युलन्स यांचे पथक येथे होते. भारत स्काऊट गाइड, रेल्वे हॉस्पिटल मेडिकल टीम व सर्व विभाग अपघात निवारण रेल्वे, तिकीट तपासणी कर्मचारी व विभागीय अधिकारी यांचेसह सहाय्य कर्मचारी उपस्थितीत असून एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन दलाने आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्तांची सुटका आणि त्यांचे वैद्यकीय सहाय्यता कशी करावी याबाबतचे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पूर्ण झाले.

Protected Content