पहूर येथील अनेक शेतकऱ्यांच्या केबल चोरी

पहूर ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथील अनेक शेतकऱ्यांच्या केबल चोरी गेल्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, काल दिनांक १७ रोजीच्या रात्रीच्या सुमारास पहूर शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या केबल चोरी गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या संदर्भात आज सकाळी शेतकरी बांधव व पहूर ग्रामस्थ यांनी पहूर पोलिस स्टेशनला येऊन पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना निवेदन दिले.

त्या निवेदनात चोरी गेलेल्या केबलचा शोध घेऊन त्या केबल आम्हाला परत मिळाव्यात व अज्ञात चोरट्या विरूद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. निवेदणावर संदिप पाटील, रविंद्र पवार, दिनेश बनकर, जगदिश कचरे, दिनकर बनकर, देवेंद्र घोंगडे, विठ्ठल बनकर, प्रकाश बनकर, शेषराव पाटील, संतोष भडांगे, गजानन बनकर, गोकुळ बनकर, संदिप सोनवणे, योगेश बनकर, हिम्मत धनगर, कविता घोंगडे, प्रल्हाद सोनवणे, रविंद्र बनकर, अविनाश सोनवणे, मनोज पाटील, परशुराम पाटील, अर्जुन घोंगडे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

 

Protected Content