मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या ‘सामना’ वृत्तपत्रातून आज (दि.५) संभाव्य खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच, राज्यपालांच्या ‘विश्रांतीयोगा’मुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुन्हा रखडल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे.
राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे खातेवाटप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले. खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी रात्री 9.45 वाजता राजभवनवर रवानाही करण्यात आली. राज्यपाल तत्काळ स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र राज्यपाल विश्रांती घेत असल्याने ते उद्या सकाळीच या यादीवर मंजुरीची स्वाक्षरी करतील असे सांगण्यात आले. राज्यपालांच्या ‘विश्रांतीयोगा’मुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुन्हा रखडले”, अशी टीका राज्यपालांवर सामनामधून करण्यात आली आहे.