जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यात ९३ ग्राम पंचायातीमधील रिक्त असलेल्या ११६ सदस्याच्या जागांसाठी ५ जून रोजी पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ९३ ग्रामपंचायतीत ग्रा.पं. सदस्यांचे अपात्रता, राजीनामे, निधन, यासह अन्य कारणामुळे ११६ ग्रा.पं. सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. गेल्या २१ डिसेंबर २०२१ रोजी १६२ ग्रा.पं.तील २२९ रिक्त जागांसाठी पोट निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही ग्रा.पं.तीत सदस्यांच्या विविध कारणामुळे जागा रिक्त झालेल्या आहेत.
या रिक्त जागांसाठी नामांकन दाखल करण्यासाठी आज २० मे शेवटची मुदत असून सोमवारी २३ रोजी छाननी, २५ रोजी माघार तर ५ जून रोजी मतदान आणि ६ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे