कजगाव (प्रतिनिधी) माझा मुलगा घरी गेला आहे व तो येईपर्यंत बस येथून पुढे नेऊ नका, असे म्हणत सोमवारी सकाळी चाळीसगाव-पारोळा बस एका महिलेने रोखून धरल्याचा धक्कादायक प्रकार कजगाव बस स्थानकावर घडला आहे.
या संदर्भात अधिक असे की, सकाळी ८ वाजेच्या सुमारास चाळीसगाव-पारोळा बस स्थानकात उभी असतांना एका महिलेने बसमध्ये बसण्याऐवजी बस रोखून धरली. माझा मुलगा घरी गेला असून तो येईपर्यंत बस येथून पुढे नेऊ नका, असे म्हणत त्या महिलेने कंडक्टर व प्रवाशाना वेठीस धरले. त्या महिलेस कंडक्टर ड्रायव्हर समजून सांगितले की, तुमचा मुलगा व आपण दुसऱ्या बसने या. उगाच प्रवाशाना वेठीस धरू नका, असे सांगितले. एवढ्यात त्या महिलेचा मुलगा आला व त्याने ड्रायव्हरला शिवीगाळ व मारठोक करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे घटनास्थळापासून पोलिस मदत केंद्राच्या हाकेच्या अंतरावर होते. त्यानंतर त्या महिलेच्या सर्वच कुटुंबीयांनी रोडवर येऊन बस अडवली. त्यानंतर ड्रायव्हरला रोडवर उतरवून बेदम मारहाण केली. तसेच बसचे देखील नुकसान केले. दरम्यान, यावेळी उपस्थित नागरिकांनी व प्रवाशांनी बस ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्यांच्या घोळक्यातून बाहेर काढले.