अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश परिवहन मंडळातर्फे बससेवा स्थगित

bas

रावेर प्रतिनिधी । अयोध्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टचा निकाल लागणार असून या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मध्यप्रदेश परिवहन मंडळातर्फे बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच शहरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आज ऐतिहासिक राम जन्मभूमी बाबत महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्ट सुमारे 11 वाजेच्या सुमारास देणार आहेत. यामुळे संवेदनशील असलेल्या बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) शहरातील बससेवा पूर्णपणे थांबवण्यात आले असून तगडा पोलिस बंदोबस्त शहरात लावण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळपासून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून एकही बस रावेरमध्ये आलेली नाही तर इकडे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस मात्र बऱ्हाणपूर मध्य प्रदेशामध्ये जात आहेत.

Protected Content