बस डेपोत अपघात : हॅन्ड ब्रेक न लावल्याने बस रॅम्पवरून घसरून दोन वाहनांचे नुकसान !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकातील सर्व्हिस सेंटरमध्ये साफसफाई बस रॅम्पवर लावली. त्यावेळी चालकाने हॅण्ड ब्रेक न लावल्याने बस रॅम्पवरून खाली घसरत गेल्याने बस डेपोच्या दोन वाहनांचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही व पुढील अनर्थ टळला.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव बस डेपोमध्ये एसटी मंडळाच्या बसची देखभाल तथा दुरुस्ती करण्यात येत असते. या ठिकाणी असलेल्या वॉशिंग सेंटरमध्ये बसची साफसफाई करण्यासाठी बसचालकने शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी बस ही वॉशिंग सेंटरमधील रॅम्पवर उभी करण्यात आली. मात्र यावेळी चालकाने बसचे हॅन्ड ब्रेक लावून बस उभी न केल्याने, रॅम्पच्या उतारवरून ही बस सरळ खाली घसरुन आली आणि समोर उभ्या असलेल्या दोन शासकीय वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाही परंतू दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेला विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दुजोरा दिला आहे.

या घटने बाबत एसटी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी किरकोळ नुकसान असल्याचं सांगत, बाईट देण्यास नकार दिला आहे. झाल्या घटनेने मात्र अनर्थ टळला असला तरी, अशा घटनेकडे बस मंडळाने गांभीर्याने घ्यायाला हवे. अन्यथा मोठा अनर्थ झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न प्रवासी वर्गात उपस्थित केला जात आहे.

Protected Content