भरधाव कंटेनरच्या धडकेत बसचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळील विटभट्टीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दिलेल्या धडकेत एसटी महामंडळाच्या बसचे नुकसान झाल्याची घटन १३ जून रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शनीवारी १५ जून रोजी रात्री १२.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव आगाराची बस क्रमांक (एमएच ४० वाय ४५५८) ही बस जळगावकडून चोपडाकडे जात असतांना विदगावकडून जळगाव कडे जाणारे कंटेनर क्रमांक (आरजे ११ जीबी ४५५८) ने जोरदार धडक दिल्याची घटना घटना ममुराबाद गावाजवळील विटभट्टीजवळ १३ जून रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. या अपघातात सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान बसच्या मागच्यामागाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शनिवारी १५ जून रोजी रात्री १२.३० वाजता बसचालक दिपक जगन शिरसाठ वय ५० रा. चोपडा जि.जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरवरील चालक परवेझ खान अख्तर खान रा. मेवात राज्य हरीयाणा याच्या विरोधात जळगाव तालुका पाोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुधाकर शिंदे हे करीत आहे.

Protected Content