बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ समृध्दी महामार्गावर खासगी बस अपघातानंतर पेटून यातील २५ प्रवासी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, नागपूरहून पुण्याला जाणार्या बसला रात्री दीडच्या सुमारास समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला. समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावाच्या जवळ अचानक बस पलटी झाली. त्यानंतर बसला आग लागली आणि यात बसमधील २५ प्रवासी जळून खाक झाले.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यास सुरुवात केली. या सर्वांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत आठ जणांचे प्राण वाचवले. तसेच बसमधील प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
बसला अपघात झाल्यानंतर आग लागली आणि अनेक प्रवाशांनी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना अपयश आल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले आहेत.