यावल (प्रतिनिधी)। येथील यावल भुसावळ मार्गावरील मोठमोठी डोलदार वृक्षे पेटवुन पाडण्याचा प्रकार सुरू असुन,या गंभीर प्रकाराकडे कुणाचे ही लक्ष नसल्याचे दिसुन येत आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल ते भुसावळ या मार्गावरील शेळगाव गावाजवळ रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या दोन्ही बाजुस असलेली मोठमोठी हिरवेगार जिवंत वृक्षांना शिताफी मध्यरात्रीच्या सुमारास पेटवुन त्यांची सर्रासपणे वृक्षांची कत्तल केली जात असुन, यावल नगर परिषदचे नगरसेवक आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे द्यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले हे भुसावळहुन यावलकडे सकाळी २ वाजेच्या सुमारास जात असतांना ही मोठमोठी जिवंत वृक्ष कुणीतरी अज्ञात व्यक्तिंनी आग लावुन पेवुन दिल्याचे निदर्शनास आले. अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही वृक्ष जळतांना पाहुन प्रा.मुकेश येवले यांना आश्चेयाचा धक्काच बसला. एकीकडे शासन हे संपुर्ण राज्यात ३३ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प हाती घेते तर दुसरीकडे मात्र अशा प्रकारे पर्यावरणाचे शत्रु अशा विविध मार्गाने वृक्षांची करून पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे गंभीर प्रकार करीत असल्याचे दिसते.
यावल भुसावळ या मार्गावर अशा प्रकारे मोठमोठी वृक्ष पेटता पेटता जर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनावर पडले तर किती मोठी आणी गंभीर घटना होवु शकते याची आपण कल्पना ही करू शकत नाही. पेटलेली काही वृक्ष अज्ञात मंडळी रात्रीच उचलुन घेवुन पसार झाली असुन, काही जळत असलेली वृक्ष हे तात्काळ काही नागरीकानी व वाहनधारकांनी संपर्क साधुन भुसावळ येथील नगरपरिषदचे अग्नीश्मन बंब बोलवुन पेट घेतलेली वृक्ष विझविण्यात आलीत. या सर्व प्रकाराकडे वनविभागाने लक्ष देणे अत्यंत गरजे आहे, अन्यथा या मार्गावरील असलेली जिवंत वृक्ष काही दिवसा नाहीसे होतील, अशी भिती पर्यावरण प्रेमींकडुन व्यक्त करण्यात येत आहे.