भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पिचर्डे परिसरात मका व चारा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मीक आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक धर्मराज पाटील (वय-५२) रा. पिचर्डे ता. भडगाव याचे पिचर्डे शिवारात शेत आहे. शेतात ७० क्विंटल काढलेला मका आणि चारा होता. दरम्यान ७ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मका आणि चारा जळून खाक झाला आहे. या आगीत ६५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक एकनाथ पाटील करीत आहे.