Home Uncategorized म्हसावद गावात घरफोडी; 56 हजारांचा ऐवज लंपास !

म्हसावद गावात घरफोडी; 56 हजारांचा ऐवज लंपास !


​जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद गावात एका तरुणाच्या बंद घरातून चोरट्याने ५६ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. विवेक किशोर चव्हाण (वय ३४, रा. म्हसावद) यांच्या घरात ही चोरी झाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, ​विवेक चव्हाण हे आपल्या कुटुंबीयांसोबत मसावद येथे राहतात. १९ ते २० ऑगस्टच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना, चोरट्याने संधी साधून कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर विवेक चव्हाण यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

​पोलिसांनी विवेक चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


Protected Content

Play sound