जळगावात मकरापार्कमध्ये भरदिवसा घरफोडी

jal

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगरातील मकरापार्कमध्ये आज दि. 6 सप्टेंबर रोजी दुपारी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे चार लाखाचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरतील बकरा पार्क अपार्टमेंट मध्ये जिविंग मधील 125 क्रमांकाच्या फ्लॅट मध्ये खुर्शिद हुसेन मजर अली (वय80) हे पत्नी फ़िज़ा यांच्या सोबत राहतात. मोहरम निमित्त घरासमोरील बोरा मज्जित मध्ये ते 10 वाजता घराला कुलूप लावून गेले. साधारण एक वाजता घरी परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील लोखंडी कपाट चोरट्यांनी तोडलेले त्यातून सोन्याचे दागिने व तीन ते चार हजार रोख रक्कम चोरून नेल्याचे लक्षात आले. तसेच या अपार्टमेंटमधील बाजूच्या विंगमध्ये काई जोहर यांच्या घराचे कुलूप देखील तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. ही माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करत असून सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचे काम सुरू होते.

Protected Content