Home क्राईम भुसावळात घरफोडी ; रोकडसह मंगळसूत्र लंपास

भुसावळात घरफोडी ; रोकडसह मंगळसूत्र लंपास

0
24
gharfodi
gharfodi

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील मदिना कॉलनीतील मश्जिद जवळ एका घराचे पत्राचे दरवाजा उचकावून अज्ञात चोरट्याने घरात असलेले रोकडसह सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रुकसारबी हाफिज शहा (वय-३०) रा. मदिना कॉलनी, मज्जीत जवळ जळगाव या कुटुंबासह राहतात. 9 डिसेंबर रोजी दुपारी ४.३० ते १० डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा पत्र्यांचा दरवाजा उचकावून घरातील २५ हजार रुपयांची रोकड आणि १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रुकसारबी शहा यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विजय नेरकर करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound