Home क्राईम अयोध्यानगरात घरफोडी; सोन्याचे दागिने लंपास

अयोध्यानगरात घरफोडी; सोन्याचे दागिने लंपास


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अयोध्यानगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून ६६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.

फिर्यादी पुरुषोत्तम पंढरी पाटील (रा. धानवड, ह.मु. अयोध्यानगर) हे घराबाहेर गेलेले असताना चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी घरात प्रवेश करून ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल आणि १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या साखळ्या असा एकूण ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली, मात्र याची तक्रार ३० जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

 


Protected Content

Play sound