तरूणाच्या घरात चोरी; रोकडसह चांदीचे ब्रेसलेट लांबविले

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी  गावातील बस स्थानकाच्या मागे राहणाऱ्या तरुणाचे बंद घर फोडून रोकड आणि चांदीचे ब्रेसलेट असा एकूण २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात रविवारी ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र नामदेव कापडणे (वय-३८)  रा. पाळधी खुर्द ता.धरणगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार ५ जुलै ते गुरूवार ६ जुलै दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले १५ हजारांची आणि ७ हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट असा एकूण २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांमध्यमान चोरून नेला. या घटनेबाबत महेंद्र कापडणे या तरुणाने धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात शनिवारी ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भालेराव करीत आहे.

Protected Content