Home क्राईम हरताळा गावात दोन ठिकाणी घरफोडी : सहा लाखांचा ऐवज लांबविला

हरताळा गावात दोन ठिकाणी घरफोडी : सहा लाखांचा ऐवज लांबविला


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५ लाख ९१ हजार ६९३ रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे रवींद्र भगवान चौधरी (वय ५१) आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे आणि शेजारी राहणारे रामभाऊ मधुकर पाटील यांचे घर बंद असताना, चोरट्यांनी १५ ते १६ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री दोघांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने असा एकुण ५ लाखा ९१ हजार ६९३ रूपयांचा ऐवज लांबविल्याचे समोर आले. सकाळी चोरी झाल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ माजली. रवींद्र चौधरी यांनी तातडीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे हे करत आहेत.


Protected Content

Play sound