चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील न्हावे येथे बंद घरातून चोरट्यांनी सुमारे २.८२ लाख रूपयांचे ऐवज लंपास केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, पुष्पा संभाजी पाटील या चाळीसगाव येथे काल गेल्या होत्या. यामुळे चोरट्यांनी संधी साधून १५ हजार रुपय रोख व २ लाख ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लपास केला. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला पुष्पाभाई पाटील यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय अभिजित लांडे करीत आहेत.