पारोळा तालुक्यातील पाच ठिकाणी घरफोडी; लाखोचा ऐवज लंपास

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील बहादरपुर, सिरसोदे, बोळे, वसंतवाडी येथे पाच ठिकाणी घरफोडी होऊन लाखो रुपयांच्या ऐवज व दागिने चोरी झाल्याची घटना १४ जुलै रोजी रात्री रविवारी घडली याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत बहादरपूर येथील राजेंद्र अण्णाजी वाणी यांचे बंद घराचे कुलूप तोडून गोदरेज कपाटातील ७० हजार रुपये रोख व सात ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गॅस सिलेंडर चोरून नेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आनंदा एकनाथ सोनार यांचे बंद घरातील कडीकोंडा व कुलूप तोडून आठ-भार चांदी व तीन ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेण्याचे सांगण्यात आले. तसेच शिरसोदे येथील किशोर पाठक यांचे देखील बंद घर फोडले परंतु त्यांच्या घरातील कुठल्याही प्रकारचे दागिने किंवा रोख रक्कम लंपास न झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी घटनास्थळी अमळनेर विभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाडकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर अभिजीत पाटील यांच्यासह पोलीस पथकाने भेट देऊन पंचनामा केला. दुसऱ्या घटनेत बोळे व वसंतवाडी येथे दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे.

पारोळा तालुक्यातील बोळे वसंतवाडी येथे देखील दोन ठिकाणी घरपोडी झाल्याची घटना १४ रोजी रात्री घडली असून लाखो रुपयाचे सोन्या सह चांदीचे दागिने व वीस हजार रुपये रोख लांबविल्याची घटना घडली आहे. पारोळा तालुक्यातील बोळे येथील राजाराम मखा कोळी हे घराला कुलूप लावून कुठेतरी गावाला गेलेले असताना त्यांचे बंद घर लक्ष्य करून घराच्या कळीकोंडा कुलूप तोडून घरातील १५ ग्रॅम सोने व २० हजार रुपये रोख चोरून नेले तसेच वसंतवाडी तांडा येथील महारु हरचंद पवार यांचे गावातच दोन घरे असल्यामुळे ते एका घराला कुलूप लावून कुटुंबासह  दुसऱ्या घरात झोपलेले असताना रात्री अज्ञात चोरट्यानीं त्यांच्या घराचे कडी कोंडा सह कुलूप तोडून घरातील गोदरेज कपाटातील दहा ग्रॅम सोन्याची चैन, बारा ग्रॅम सोन्याचे नेकलेस, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, चांदीचे 40 भारचे वेले, एक ग्रॅम सोन्याचे ओम पदक, एक ग्रॅमची सोन्याची लहान मुलाची अंगठी असे एकूण साडेतीन तोडा सोने व ४० भार चांदी चोरून नेल्याची घटना घडली.

सदर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे प्रकाश गवळी यांच्यासह अमळनेर पोलीस विभागीय अधिकारी सुनील नंदवाडकर पोलीस निरीक्षक सुनील पवार, यांनी भेट दिली. यावेळी श्वान पथक व फिंगर प्रिंट पथक हे बोळे वसंतवाडी शिरसोदे, बहादरपूर येथे मागविण्यात आले होते मात्र श्वान पथकाने कुठल्याही प्रकारचा माग न दाखवल्यामुळे पोलिसांना पुढचा तपास करता आला नाही सदर बहादरपुर सिरसोदे व बोळे गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याने त्यात एक सफेद कलरची कार दिसून येत आहे मात्र त्यात किती जण आहेत कोण आहेत हे दिसून आले नाही बोळे येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर कार ही पहाटे पाच वाजून अकरा मिनिटाला ढोलीकडे जाताना दिसून येत आहे सदर चोरटे हे बोळे वसंतवाडी मार्गे बहादरपुर शिरसोदे कडे चोरी करत गेले असून ते परत पहाटे धुळ्याकडे रवाना झाले असल्याचे दिसून येत आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता.

Protected Content