अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील मुंदडा नगर एक जवळील कस्तुराबाग व सोनार नगर परिसरात रात्री दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली.
या संदर्भातील वृत्त असे की, शहरात दिनांक २८ रोजी रात्री दोन घरफोड्या झाल्या. यात कस्तुराबाग येथील रहिवासी नितेश रोहिदास पाटील (एस टी वाहक ) यांच्या घराच्या कडी कोंडा तोडून चोरांनी कपाटातील कापडे असताव्यस्त करुन नुकसान केलेे. मात्र रोकड, सोने काहीही चोरीला गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. यांच्याच घराच्या बाजूलाच लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेर्यात चोर हे रात्री ३.४५ वाजता (पावणे चार ) घराचे कडी कोंडा तोडून घरातील साहित्याचे नुकसान केले. तर सोनारनगर येथील श्रीमती कल्पना सूर्यवंशी यांच्याही घराचे कडी कोंडा तोडले. मात्र काहीही चोरी न झाल्याचे त्यांनी सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे काल ता.२७ रोजी ही अमळनेर शहरात भर दिवसा चोरी झाली होती.
दरम्यान अमळनेर शहरात पुन्हा चोरीचे प्रमाण वाढले असून स्वताच्या घरात राहणे लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. एकीकडे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने गस्तीवर असतांना दहा वाजेनंतर शहरातील लहान मोठी दुकाने हाटेल्स बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे.ती कौतुकास्पद आहे. मात्र हीच तसदी कॉलनी एरियात देखील घ्यावी व पोलिसांनी लक्ष घालून रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सुजाण अमळनेरकर करीत आहेत!