गोऱ्हे आणि बैल निर्दयीपणे कोंबून वाहतूक; २४ गुरांची केली सुटका

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाहनात २४ गोऱ्हे आणि बैल निर्दयीपणे कोंबून ते कत्तलीसाठी घेवून जाणारे वाहन काही नागरिकांनी प्रभात चौकातील महाराणा पुतळ्याजवळ पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास पकडले. त्यांनी वाहनातून तब्बल २४ गोवंशांची सुटका करुन त्यांना गो- शाळेत जमा केले आहे. याप्रकरणी शनिवारी पहाटेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसात वाहन चालक फिरोज खान अय्युब खान (रा. सानेगुरुजी वसाहत, चोपडा) व वाहन मालक मुद्दसर मुख्तार सैय्यद (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा येथून जळगावकडे कत्तलीसाठी गो- वंशाची वाहतुक करणारा आयशर जात असल्याची माहिती शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उदय सुभाष पाटील (रा. विठ्ठपेठ, पाटीवाडा, असोदा) याला मिळाली. त्याने लागलीच जळगावातील कुलदीप पाटील, वैभव चौधरी, निलेश वाणी, कुणाल सोनार यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर (एमएच ०४, जेके ४८७४) क्रमांकाचा आयशर ट्रक हा आव्हाणे गावात थांबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र चालकाने तो थांबवला नाही. त्यामुळे तरुणांनी त्या ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान, पावणेपाच वाजेच्या सुमारास तरुणांनी हा ट्रक काही नागरिकांच्या मदतीने प्रभात चौकातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ थांबवला. त्यांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गो-वंश कांेबलेले होते. यावेळी त्याठिकाणी जमलेल्या काही जणांनी वाहनाच्या काचा फोडल्या. दरम्यान, काही वेळातच त्याठिकणी पोलीस आल्याने त्यांनी ट्रक चालक फिरोज खान अय्युब खान याला ताब्यात घेतले. त्यानंतर वाहनातील गोवंश हे बाफना गोशाळेत जमा केले.

कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या आयशर वाहनात २४ गोऱ्हे आणि बैल अत्यंत निर्दयीपणे कांेबलेले होते. दरम्यान, हे बघताच त्याठिकाणी उपस्थित असलेल्या काही जणांनी वाहनाच्या काचा फोडल्या. पोलिसांनी वाहन जप्त केेले असून वाहन चालक फिरोज खान अय्युब खान (रा. सानेगुरुजी वसाहत, चोपडा) व वाहन मालक मुद्दसर मुख्तार सैय्यद (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content