साकेगावात बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा ; पोलीसांचा चोख बंदोबस्त

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे पारंपारिक पध्दतीने बैलपोळा सण सोमवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावात पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या साकेगाव येथे सोमवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पारंपारिक पध्दतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांची सजावट करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर गावातील शिव येथे जावून बैलांकडून फेऱ्या मरण्यात आले. त्यानंतर साकेगावातून वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील दरवाजाजवळ शेतकरी बांधवांनी आपला बैलांना सजवून एकत्र आणण्यात आले. त्यानंतर उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. त्यानंतर शेतकरी बांधवांनी आपल्या घरी बैलजोडीला नेवून त्यांना नैवैद्य देण्यात आले. यावेळी साकेगावात पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, पोलीस पाटील गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content