Home क्राईम पिकअप वाहनाच्या धडकेत बुलेटस्वार गंभीर जखमी

पिकअप वाहनाच्या धडकेत बुलेटस्वार गंभीर जखमी


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील तोतला पेट्रोल पंपाजवळ भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत बुलेटस्वार तरूण जखमी झाल्याची घटना २१ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाल काशीनाथ पवार वय ३५ रा. सावदा ता.एरंडोल हा तरूण २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बुलेट क्रमांक (एमएच १९ ईजे २३९९) ने जळगावकडून सावदा गावी जात असतांना पाळधी गावाजवळील तोतला पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणारी पिकअप वाहन क्रमांक एमएच ५४ ०११४ ने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात गोपल पवार हा बुलेटस्वार तरूण गंभीर जखमी झाला आणि वाहनाचे देखील नुकसान झाले, ही घटना घडल्यानंतर पिकअप वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन घेवून पसार झाला. जखमी झालेल्या गोपाल पवार याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जखमी तरूणाचा भाऊ भरत पवार याने धरणगाव पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound