खामगाव प्रतिनिधी। अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघात अति पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झालेअसून शेतकर्यांना मदत मिळण्यासाठी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.
पालकमंत्री ना. संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व कृषी विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी शेतात उभ्या असलेल्या पिकांसोबतच शेतकर्यांनी कापून ठेवलेले पिकाचा देखील सर्वे करण्यात यावा व त्यांना देखील मदत देण्यात यावी अशी मागणी केली. शेतात कापून ठेवलेले पिके पावसामुळे ओले होऊन त्याला कोंब फुटले आहेत व शेतकर्याचे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतीचे सर्वे करताना शेतकर्याने शेतात कापून ठेवलेल्या पिकाची देखील सर्वे करण्यात यावे व त्यानुसार त्यांना मदत देण्यात यावी. कृषी व महसूल विभागाने संयुक्त अहवाल तातडीने शासनास सादर करावे जेणेकरून शासनाकडून तातडीने मदत देण्यात येईल अशी मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी या बैठकीत केली. यावेळी जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी व सर्व कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.