मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाव्यतिरिक्त बहूजन समाज पक्षाने अचानक आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बसपने शाहीर नंदेश उमप यांना उमेदवारी दिली आहे. पेशाने शाहीर-गायक असलेले नंदेश उमप हे प्रथमच आपल्या राजकीय कारकीर्दला सुरूवात करत आहे. या मतदारासंघातून भाजपकडून मिहीर कोटेचा आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दीना पाटील लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात आहे.
नव्या इनिंगला सुरूवात झालीय. मनात खूप चांगली भावना आहे.गाणे तर चालू आहेच, पण ही इनिंग लढायला काय हरकत आहे. म्हणून लढतोय. माझा जन्मच विक्रोळीत झालाय. तिथं आमची माणसं आहेत. तसंच सर्वच जातीधर्माची माणसं आहेत. मला लोक ओळखतात. बाबांनी केलेले काम आहे तिथे. म्हणून तेथून लढतोय. तर बसपाने मला लढण्याची ऑफर दिली म्हणून बसपातर्फे लढतोय, बाबासाहेबांची ऊर्जा घ्यायला मी चैत्यभूमीवर आलोय. सर्वांची प्रेरणा घेवून लढतोय. रसिकांनी माझ्या गाण्यावर प्रेम केलंय. ते मला इथंही साथ देतील. कलाकारांचा मुद्दा दिल्लीत मांडायचा आहे. मी लढणार आहे. मी थांबणार नाही. समोरचे लोकही चांगले आहेत.परंतु हमभी किसीसे कम नही असे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नंदेश उमप म्हणाले.