जळगाव (प्रतिनधी ) गुरुवार ११ एप्रिल रोजी शिवसेना व भाजप युतीतील समनव्यक ना. गिरीष महाजन व ना. दादा भुसे, ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व प्रमुख लोकप्रतिनिधीची बैठक भुसावळ येथिल होटेल तनारीका येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीस सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख , शहरप्रमुख, उपजिल्हा संघटक, तालुका संघटक , शहर संघटक, महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटप्रमुख, गणप्रमुख , विभागप्रमुख , युवासेना प्रमुख पदाधिकारी सर्व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी ठीक संध्या. 6:00 वा. भुसावळ येथिल होटेल तनारीका येथे उपस्थित उपस्थिती रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.