अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १६ मध्ये वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीएससी पावडर फवारणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
हवामानातील बदलामुळे डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारखे संसर्गजन्य आजार पसरू नयेत, यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम मा. आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी नगरसेविका निलिमा पाटील, नगरसेवक महेश देशमुख, आरोग्य सभापती प्रा. रामकृष्ण पाटील यांच्यासह रवि पाटील, कपिल पाटील, संजय पाटील, रोहित तेले, महेश पाटील, प्रविण महाजन, विजय वाणी, किशोर सैंदाणे, विजय चौधरी, भास्कर भावसार, मुकादम समाधान केदार तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेसाठी मुख्याधिकारी गणेश शिंदे, आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव आणि संतोष माणिक यांचे विशेष सहकार्य लाभले.
नगरपरिषदेकडून शहरातील सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने फवारणी मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



