मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना तातडीने विधानभवनात हजर करा या मागणीसाठी आज सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
आज राज्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहचला असून शिंदे गटाच्या दोन याचिकांवर काय निकाल येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता सामाजिक कार्यकर्ते तथा विविध मुद्यांवरून कायदेशीर लढा देणारे ज्येष्ठ विधीज्ज्ञ ऍड. असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी बंडखोर आमदार हे गेल्या सहा दिवसांपासून राज्याबाहेर असून यामुळे लोकांची कामे खोळंबली आहेत. कामे होत नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना तातडीने विधानभवनात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी या जनहित याचिकेमध्ये केली आहे. यावर आजच सुनावणी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.