धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशभरात घेण्यात आलेल्या जेईई मेन २०२४ सत्र -१, संयुक्त परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये धरणगाव येथील प.रा.संस्था संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या इ. १२ वीच्या विद्यार्थी साई राजेंद्र वाघ याने ८८ पर्सेंटाइल मिळवून आपले कौशल्य दाखवून यश प्राप्त करीत महाविद्यालयाचे नाव मोठे केले आहे. त्याने अतिशय खडतर प्रवास करून हे यश संपादन केले आहे.
अतिशय खडतर आणि आव्हानात्मक अशी JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. JEE-Mains आणि JEE-Advanced अशी दोन टप्प्यांत होणारी ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी या केंद्रीय संस्थेमार्फत ही परीक्षा देशभरातील २९१ शहरांसह, भारताबाहेरील २१ शहरांत घेण्यात आली. यंदा साधारण बारा लाख सत्तर हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. परीक्षेत मिळालेल्या श्रेणीनुसार भारतातल्या अतिशय नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.
आरटीआय चे जिल्हाध्यक्ष तथा धरणगाव अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र व ललिता वाघ यांचा मुलगा साई राजेंद्र वाघ हा जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलला असतांना प्राचार्य डॉ. गोकुळ महाजन, मेघना राजकोटिया मॅम, अर्चना चौधरी मॅम, हिरालाल गोराणे, दिपक भावसार, सचिन भोसले, स्नेहा बागुल मॅम व क्लासचे शिक्षक हर्षद चौधरी, धरणगाव यांच्या मार्गदर्शनात इ.१० वी मध्ये ९३% गुण मिळविले होते. प.रा.संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुळकर्णी, सचिव डॉ. मिलिंदकुमार डहाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस बी शिंगाणे, उपप्राचार्य आर आर पाटील, पर्यवेक्षक बी एल खोंडे, प्रा.ए आर पाटील, श्रीमती प्रा.आर पी चौधरी मॅम, प्रा. डी डी पाटील, प्रा.एस झेड पाटील, प्रा.एम एस कांडेलकर, प्रा.गजानन माळी आणि सर्व गुरूवर्यांचे व आई वडिलांसह परिवाराचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यानिमित्ताने साई राजेंद्र वाघ याचे पोदार इंटरनॅशनल स्कूल व सर्व क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.