लाचखोर नगररचना सहाय्यक वन्नेरे निलंबित

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या नगररचना विभागातील मनोज वन्नेरे यांनी बांधकाम परवानगीसाठी १५ हजारांची लाच घेतल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर जळगाव महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी वन्नेरे यांचे निलंबित करण्याचे आदेश काढले आहे.

 

जळगाव महानगरपालिकेतील नगररचना विभागात पिंप्राळा शिवाराची जबाबदारी असलेले रचना सहायक मनोज वन्नेरे यांना ९ डिसेंबर रोजी बांधकाम परवानगीसाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात महापालिका आयुक्त व नगररचना विभागाचे सहायक संचालकांसाठी पैसे घेतल्याचे तक्रारीत म्हटले होते. वन्नेरेला अटक करण्यात आली होती. त्याला १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी वन्नेरे याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

Protected Content