जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हाउपनिबंधक कार्यालयातील जिल्हा लेखा परिक्षक अधिकारी यांनी पथसंस्थेकडून ऑडीटसाठी ३२ हजार रूपयांची लाच घेतांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार आणि इतर सहकारी यांनी यांच्या विविध पथसंस्थेच्या ऑडीटसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील जिल्हा लेखा परिक्षक अधिकारी रावसाहेब बाजीराव जंगले (वय 51) रा.जळगाव यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. दरम्यान, ऑडीटच्या छाणणीसाठी तक्रारदारांकडून ५२ हजार रूपयांची लाचेची मागणी ३१ जुलै रोजी केली होती. तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत रितसर तक्रार केली. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने आज सायंकाळी सापळा रचून लाचखोर जिल्हा लेखा परिक्षण अधिकारी जंगले यांनी ॲडीट छाणणीसाठी मागीतलेल्या रकमेपैकी ३२ हजार रूपयांची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
यांनी केली कारवाई
नाशिक येथील एसीबीचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने, पोलीस उप अधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, पोकॉ दिपक कुशारे, सचिन गोसावी, एकनाथ बावीस्कर, चालक पो ना दाभोळे यांनी कारवाई केली.