ब्रेकींग : विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र; भारताच्या अपेक्षांना धक्का !

नवी दिल्ली-वृत्तसेवा | विहित नियमापेक्षा जास्त वजन भरल्याने विनेश फोगाट ही ऑलिंपीकच्या फायनलसाठी अपात्र ठरल्याने भारताच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने काल लागोपाठ तीन सामने एकतर्फी पद्धती जिंकून मोठ्या दिमाखदार पद्धतीत 50 किलोग्रॅम वजनी गटात फायनलमध्ये प्रवेश केला होता. यामुळे तिला सुवर्ण किंवा रोपे या दोघांपैकी एक पदक मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. तिचा अंतिम सामना आज असल्यामुळे तिला नेमके कोणते पदक मिळते याबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली होती. मात्र ऑलिंपिक समितीने विनेश फोगाट हिला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. विनेश चे वजन हे 50 किलोग्रॅम पेक्षा थोडे जास्त भरल्यामुळे तिला अपात्र करण्यात येत असल्याचे कारण देण्यात आले आहे.

कोणत्याही कुस्तीपटूला विहित वजनापेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त असल्याची परवानगी दिली जाते पण विनेशच वजन यापेक्षा जास्त भरल्यामुळे तिला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले असून भारतीय ऑलिम्पिक समितीने या वृत्ताला दुचारा दिला आहे.

विनेश फोगाटला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरण्यात आल्यामुळे भारताच्या सुवर्ण व रोप्य पदक मिळवण्याच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे या प्रकरणी आता भारतीय ऑलिम्पिक समिती नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content