ब्रेकींग : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गेल्या ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार २८ जून रोजी समोर आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून २० वर्षीय तरूणावर गुरुवारी ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायत असित पांडा (वय २०, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी सायत असित पांडा याने पिडीत मुलाचे काही फोटो मोबाईलमध्ये घेतले होते. त्यानंतर हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देत, संबधिताने अल्पवयीन मुलावर गेल्या ८ महिन्यांपासून वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर पिडीत मुलाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर वेगवेगळे बनावट अकांऊट तयार करुन व्हायरल केले. त्यानंतर २८ जून रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिडीत मुलाच्या आईने गुरुवारी ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता सायत पांडावर शनिपेठ पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. पुढील तपास शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे करत आहेत.

Protected Content