जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये ४ ते ५ पोलीस कर्मचाऱ्यांनी गणवेशात येवून झालेल्या आपापसात झालेल्या वादातून हाणामारी झाली. त्यानंतर कार कार काढतांना दोन दुचाकींना धक्का देवून पाडल्या त्यानंतर थोड्या अंतरावर एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाल्याची घटना रविवारी २५ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये चार ते पाच पोलिस कर्मचारी रविवारी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणवेशातच आले होते व वर जॅकेट घातले होते. बारमध्ये बसलेले असताना तेथे ग्लास फोडले. त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आपसात वाद झाले. हा वाद वाढतच जाऊन तिघे जण एकमेकांना भिडले.
हे कर्मचारी कारमध्ये (क्र. एमएच ०२, ईएच १०४८) बसले व ती काढत असताना दोन दुचाकींना धक्का दिल्याने त्या खाली पडल्या. त्यानंतर कशीबशी कार काढली व रस्त्याला लागल्यानंतर समोर एका सायकलस्वार मुलाला धडक दिली. त्यात तो मुलगा खाली पडला तरीदेखील न थांबता कारचालक भरधाव वेगाने पसार झाला. यात सुदैवाने मुलाला काही दुखापत झाली नाही.
या वादाविषयी परिसरातील काही व्यावसायिकांनी जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी तेथे कर्मचारी पोहचले. त्यांना कारचालक पसार होताना दिसले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.